Wednesday, July 17, 2019

  w

मुलाखतीनंतरही एक मुलाखत चालू राहते तसे हे लिखाण आहे स्वतःला समजून घेण्याचा आपल्या आसपास जे घडतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न आहे इतरांच्यापर्यंत तो  पोहचत नसेल तर त्याची नेमकी कारणं काय ? पोस्टमॉडर्न भाषा ही आजही स्कॅन केली जातआहेच असो अहंकार स्पष्टता अंधुक करतो असे काही होते आहे का तेही पाहायला हवे

अभ्यासक्रम माहित नसतांना क्लासेस कसे घेणार ?

असा नका विचार करू काही गोष्टी जुळून यायला उशीर होतो देरसे आना ठीक हैं गर तंदुरुस्त आते हो 
जागतिक दर्जाची गुणवत्ता आपणाला स्वतःहून का कळत नाही ? आपले ह्याबाबतीतले नेमके घोळ काय आहेत ? कि आपली गुणवत्ता ओळखण्याची क्षमता वर्णजातीगोतावळा व्यवस्थेने मारून टाकली आहे ? आपण ज्यांना मान्यता दिली ती आपण दिली कि जगाने मान्यता दिल्यावर आपण दिली ? जागतिक गुणवत्ता ओळखण्याच्या आपल्या कसोट्या काय आहेत नोबल बुकर प्रायझेस ?त्यांचा खप ? त्यांना मिळालेली प्राईस ? मानधन ?

 ज्याला नोबल मिळालेले नाही असे समकालीन परदेशी लेखक आपण वाचतो ?आपण अत्यंत भुक्कड लेखक कवी मराठीबाहेर का प्रमोट करतो ? चांगला लेखक मान्यतेअभावी मरून जावा अशीच आपली व्यवस्था आहे काय ?

समानता वसाहतवाद १७५७ ते १८५७

,वसाहतवाद १८५७ ते १९४७ ,

 नववसाहतवाद १९४७ ते १९७८

आणि उत्तरवसाहतवाद १९६५ ते १९९०

अशा चार स्टेप्स आपणाला स्पष्ट दिसतात हे सर्व सोडून आपण एकदम देशीवादाची चर्चा का करायला लागलो ?
आफ्रिकेतल्या अत्यंत मागासलेल्या देशातसुद्धा ह्या चर्चा झडझडून झाल्या पण भारतात नुसती पत्रकारिता झाली ?
का ?

श्रीधर तिळवे नाईक





ह्याचा अर्थ आपण समकालीन साहित्याला न्याय देणारे समीक्षक निर्माण करण्यात अयशस्वी झालोय असा होत नाही का ? काव्याग्रहसारखे नियतकालिक चौथ्या नवतेकडे सरकू सुद्धा शकत नाही ह्याचे कारण काय ? देशीवादात गटांगळ्या किंवा सत्यकथेचे कीर्तन हे मराठी साहित्याचे स्वभावविशेष झाले आहेत काय ? प्रचारासाठी फेसबुक वैग्रे चौथी नवता आणि साहित्य मात्र तिसऱ्या किंवा दुसऱ्या नवतेचें ह्या विरोधाभासाचे काय करायचे ? देशीवादाने ऐंशोत्तरी आणि नव्वोदत्तरी गिळली का आणि आताची समकालीन म्हणवून घेणारी पिढीही देशीवादाच्या बसमध्ये का चढू इच्छिते ?






मान्यतेला फाट्यावर मारत लिहायला लागणे हे त्या संस्कृतीचे अपयश असते जोतिबा फुलेंच्यापासून अनेक लेखक हे फाट्यावर मारूनच लेखन करत आले आहेत माझा प्रश्न लेखकाला हे का करावे लागते हा आहे ?
गोतावळा व्यवस्था हे सर्व करत असेल तर आपण सर्व गोतावळे का फाट्यावर मारत नाही ? सर्वचजण गोतावळ्याच्या भाषेत का समीक्षा करायला लागतात बर सत्यकथेने स्वतःच्या मूल्यव्यवस्था तरी डिफाइन केल्या होत्या देशीवादाने नवी मूल्यव्यवस्था डिफाइन करण्याचा प्रयत्न केला ऎशोत्तरी पिढीने निदान साठोत्तरी पिढीपेक्षा आमचा देशीवाद कुठे वेगळा आहे हे तरी नीट डिफाइन करायला नको काय ?


























१ मे २००९



रात्र जी डावी होती डावरी होती अभिताभ बच्चनसारखी
उजवी झालीये शाहरुखखानसारखी

श्रम सूक्ष्म आणि नग्न होत चाललाय
जेणेकरून चाबूक मारताना कपडे फाटणार नाहीत

पराभव टाळ्या वाजवतोय
एन्ड ऑफ हिस्ट्रीच्या

शेवट मृत्यूचं चुंबन घेणार कि पुनर्जन्माचं
कुणालाच माहित नाही

बसवेश्वर म्हणाले सर्व श्रमांना समान प्रतिष्ठा
आणि सर्व श्रमांना समान वेतन

माझ्यासाठी कम्युनिझम बस्वेश्वरांच्यापासून सुरु होतो

छातीला छाती भिडवून
हात पकडत श्रमांना मिठीत घेण्याचं युग संपलं का ?



शंकराच्या चंद्रकोरीपाशी मी कधीच विळा ठेवला नाही
गांधींचा झाडू ठेवला
आणि नांगर

अनुभवमंडपात बसतांना बसवेश्वरांना हत्या होण्याआधी जी निराशा आली होती
तीच आता सर्व श्रमिकांच्या  काळजात

पृथ्वीचं चुंबन घेऊ पाहणारे
स्वतःच्या ओठांना टिकवण्याची धडपड करतायत

मार्क्सचा जन्म काही राजांना मुकुट देण्यासाठी झाला होता
आणि त्यांना मुकुट मिळाले
त्यांनी राज्य केले
आणि सर्व राज्यांप्रमाणे हीही राज्ये धुळीला मिळाली

आता ती धूळ भारताच्या प्रत्येक गल्लीतून
हरलेल्या राणीसारखी हिंडतीये
म्हणून शोक कशाला ?



मे डे डिमॉन्स्ट्रेशन्सच्या विळाफेकीवर
एक सभ्य मर्डर
तरंगणारा

गडचिरोलीचा धूर हॅंड्सप करून निघून गेलाय

तुम्हांला ह्या देशाची मूळंच पकडता आली नाहीत
आणि तुम्ही झाडावर शेखचिल्लीसारखे बसून

सेमसेक्स मॅरेज सारखं एक फिलिंग
ज्याला गव्हाच्या दाण्याची परिपूर्ती नाही

चे गव्हेराचे टी शर्ट घालून मी कधी फिरलो नाही
मात्र बसवेश्वरांचे कायक मी आयुष्यभर सांभाळले

आळसाला वाट मिळू नये
आणि श्रमांना काट मिळू नये
हा समतोल साधावा कसा

माझ्या घरात माझी सारी भावंडं कामगार
ह्याची मला कधीच लाज वाटली नाही

त्यांच्या श्रमांना योग्य मोबदला नाहीये
आणि प्रतिष्ठाही

सकाळ सूर्याचा कप घेऊन येते
प्रकाशाचा चहा पाजते
संध्याकाळी सूर्य समुद्रात विसळून निघून जाते
ह्यामागे केवढी अवाढव्य उलाढाल आहे
हे मी जाणतो

श्रमांची प्रतिष्ठा सकाळच्या कपापासून सुरु होते



कम्म्युनिझम मेला तरी श्रम अमरच असणार आहेत
त्यामुळं श्रमाला टाळू म्हणणारे युटोपियात जगतायत

मी युटोपियन नाही

पण
इकॉनॉमिक क्रायसिस आला कि कम्युनिझमला संधी
इकॉनॉमिक डिप्रेशन आले कि भांडवलशाहीचा अंत
इतका भोळसट्पणाही
बसवेश्वरांनी आम्हाला शिकवलेला नाही

डोळे ताणवून सरोवरात समुद्र पाहणे
ही विद्या नाही
भ्रम आहे

१९८९ न्यू वर्ल्ड ऑर्डर
आणि २००८ बँकिंग सिस्टीम कोलॅप्स म्हणजे
वर्ल्ड ऑर्डर कोलॅप्स
इतकं सर्व सोपं ?

गेले कित्येक महिने
नवा दरवाजा उघडलाय
आणि आत कोणीतरी वाट पाहतंय

कार्पोरेटशाही म्हणजे काय रामसेचा  हॉरर पिक्चर वाटला काय तुम्हाला
कि सापडली भुतं
आणि पिटाळली भूतं ?



जेव्हा श्रमांचा  चेहरा दिसत नाही
तेव्हा श्रमांचे पाय दिसतात हात दिसतात

आणि ज्यांना हातपाय दिसत नाहीत
त्यांना डोळे नसतात

वजनी आधारांना
आजारसुद्धा कबूल करू न देणारी व्यवस्था

डोळे कायम फुटबॉलसारखे हलते

रक्ताचा लाल पाठलाग आणि मागोवा

वाली नसल्यासारखी तगमग तगमग

श्रमांना इतका पोरकेपणा कुठल्या युगात होता ?



१ मे अजून श्रमांची पुण्यतिथी म्हणून साजरी करत नाही हीच मेहरबानी

नेमकं काय चुकलंय ?

टोकाला जाणारे धड मध्यातही परतलेले नाहीत

एक दारू तयार झाली आणि सम्पली इतकंच ?

आधी हम दो हमारा एक
मग पूर्ण निर्व्यसनी असणे
मग
मग

मी बोलायला खूप बोलू शकतो
माझ्या जीभेने राजीनामा दिलाय

तुम्ही दारूची बॉटल फोडा
आणि कंडोम वापरा

लेबर इज अ टेल कंट्रोल्ड बाय अँन इडियट

श्रीधर तिळवे नाईक

(नेट सीरिजमधील नेट थिम्स मधून )









H


B










L

Tuesday, April 23, 2019

अनुवादाची अनुमती मी मागेच दिलेली आहे . तुम्ही स्वतःला सामान्य वाचक म्हणवून घेत असाल तर माझी गणना अति सामान्यातच करावी लागेल . जी पुस्तकांबाबत ऑफर दिली आहे त्याबद्दल धन्यवाद !

अंतर्दृष्टी (इन्साईट )म्हणजे शहाणपण न्हवे पुस्तक इन्साईटच्या पलीकडे जाऊ शकत नाहीत ही त्यांची मर्यादा त्यामुळेच पुस्तक वाचून कुणी मोक्षाला उपलब्ध होत नाही आणि शहाणपण मोक्षाची उपनिर्मिती आहे

मावशीला म्हणजे ताईला  अध्यात्मात काडीचाही रस न्हवता त्यामुळं घरातल्या अध्यात्मिक ग्रंथांचे महत्वच तिला कळले नाही फक्त काळी जादू वैग्रे भानगडीबाबतचे ग्रंथ तिने जपून ठेवले माझ्या वडिलांच्याबाबतची तिची खुन्नस हा एक वेगळाच मुद्दा आहे तिने स्वतः मला वडिलांची पेंटिंग्ज दाखवली होती आता ती कुठं आहेत माझ्या घरात लावलेलं नागेशीचं पेंटिंग हे एकमेव पेंटिंग आता शिल्लक आहे आणि तेही प्रार्थनाने शोधून आणून दिले म्हणून !. रोहिदासमामा म्हणजे तुझ्या वडिलांनी मला लहानपणी दिलेली तीन  पुस्तके मला आठवतात राजपुत्र ठकसेन , नवनाथ आणि टारझन ! असो आता महत्वाचे आहे ते मामाच्या आठवणींचे काम ! मामाने सरपंच ते आमदारकी आणि नंतरची मगोची पडझड हे सर्व जवळून पाहीले आहे आणि ते सगळं नीट पुढच्या पिढ्यापर्यंत पोहचलं पाहिजे . मी पुन्हा पुन्हा सांगतोय हे रेकॉर्ड करून ठेव . मावशीला म्हणजे ताईला  अध्यात्मात काडीचाही रस न्हवता त्यामुळं घरातल्या अध्यात्मिक ग्रंथांचे महत्वच तिला कळले नाही फक्त काळी जादू वैग्रे भानगडीबाबतचे ग्रंथ तिने जपून ठेवले माझ्या वडिलांच्याबाबतची तिची खुन्नस हा एक वेगळाच मुद्दा आहे तिने स्वतः मला वडिलांची पेंटिंग्ज दाखवली होती आता ती कुठं आहेत माझ्या घरात लावलेलं नागेशीचं पेंटिंग हे एकमेव पेंटिंग आता शिल्लक आहे आणि तेही प्रार्थनाने शोधून आणून दिले म्हणून !. रोहिदासमामा म्हणजे तुझ्या वडिलांनी मला लहानपणी दिलेली तीन  पुस्तके मला आठवतात राजपुत्र ठकसेन , नवनाथ आणि टारझन ! असो आता महत्वाचे आहे ते मामाच्या आठवणींचे काम ! मामाने सरपंच ते आमदारकी आणि नंतरची मगोची पडझड हे सर्व जवळून पाहीले आहे आणि ते सगळं नीट पुढच्या पिढ्यापर्यंत पोहचलं पाहिजे . मी पुन्हा पुन्हा सांगतोय हे रेकॉर्ड करून ठेव . दोन्ही आजोबा , माझे आईवडील ,दत्ता दादा ह्यांच्यामुळे आपल्या दोन्ही घराण्यांचा (तिळवे नाईक )इतिहास माझ्याकडे आहे पण जे मामाने पाहिले आहे ते कुणीच पाहिलेले नाही . प्रत्यक्ष राजकारण खेळलेला मनुष्य फार वेगळ्या नजरेने घटना बघत असतो . आपल्या मागल्या भेटीत मामाने इंदिरा गांधींचा सांगितलेला किस्सा भन्नाट होता असे अनेक किस्से त्याच्याकडे आहेत आणि ते आपणाला काढूनच घ्यावे लागणार तेव्हा बंधुराज जरा मनावर घ्या  माझे आईवडील ,दत्ता दादा ह्यांच्यामुळे आपल्या दोन्ही घराण्यांचा (तिळवे नाईक )इतिहास माझ्याकडे आहे पण जे मामाने पाहिले आहे ते कुणीच पाहिलेले नाही . प्रत्यक्ष राजकारण खेळलेला मनुष्य फार वेगळ्या नजरेने घटना बघत असतो . आपल्या मागल्या भेटीत मामाने इंदिरा गांधींचा सांगितलेला किस्सा भन्नाट होता असे अनेक किस्से त्याच्याकडे आहेत आणि ते आपणाला काढूनच घ्यावे लागणार तेव्हा बंधुराज जरा मनावर घ्या
------------------------------------

हे वैयक्तिक स्पष्टीकरण नाही कविता ह्या वाङ्मयप्रकारावर चर्चा व्हावी म्हणून हे लिहितोय माझ्या प्रेयसीवर आईवर बहिणीवर कविता लिहितांना तिचे सगळे विचार पटायलाच हवे असं नाही भगवान शिव विवेकानंद तुकाराम आंबेडकर मार्क्स महंम्मद गांधी अशा अनेकांच्यावर मी कविता लिहिल्या त्या काही त्यांचे सगळे विचार पटतात म्हणून न्हवे . पतंजलीच्या योगाची सर्वात शास्त्रशुद्ध मांडणी विवेकानंदानी केली आणि कविता योगसाधना राजयोग स्वामी विवेकानंद अशा पार्श्वभूमीवर आहे आणि मी एफ वायला होतो तेव्हा लिहिली होती विवेकानंदांनी त्यावेळी डोक्याला चांगलाच शॉट दिला होता ज्यांना विवेकानंदांची कास्ट दिसते त्यांना सलाम विवेकानंदांचे विचार त्यांच्या काळाचे आहे आणि त्यावर वाद व्हावा पण कविता काही विवेकानंदांच्या विचारांवर नाही

मी त्यावेळी स्वामी प्रभावित होतो बसवेश्वर प्रभावित होतो बुद्ध प्रभावित होतो गांधी प्रभावित होतो आंबेडकर प्रभावित होतो मार्क्सप्रभावित होतो कारण एकोणीस वर्षाच्या पोराची अक्कल एवढीच असते माझा इलाका हा कोल्हापुरातील सर्वाधिक मारामाऱ्या करणारा इलाका आहे मी विवेकानंद वाचले नसते तर मीही हातात तलवारी घेऊनच हिंडलो असतो
तेव्हा स्वामी प्रभाव तुम्हाला प्रॉब्लेमॅटिक वाटू शकतो पण माझे जीवन बदलवण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे
-------------
मला काही भरारी वैग्रे वाटत नाही मला त्याकाळातही माझ्या मर्यादाच दिसत होत्या हायर मॅथेमॅटिक्स व स्टॅटिस्टिक्स मधलं आपल्याला घंटा काही कळत नाही ह्याची खंत होती आजसुद्धा ९९. ९९९९९९९ % गोष्टींमधलं काही कळत नाही त्यामुळं भरारी कसली घंटा ?सि व्ही रामन चंद्रशेखर ह्यांच्यासारखे काही काम केले असते तर भरारी ! करून करून केलं काय तर कविता !
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

आदरणीय अरुंधतीजी
मागील प्रतिक्रिया घाईत दिली होती कारण मी लंघनावर होतो तीन दिवस अन्नपाणी वर्ज्य करून ! असो ! सुरवात झाली हे महत्वाचे ! मी पुन्हा एकदा सांगतो भाषांतराबाबत काही बोलण्याचा मला अधिकार आहे असं मला वाटत नाही ती वेगळीच कला आहे योगात आत्मा एका शरीरातून काढून दुसऱ्या शरीरात ठेवतात तसे !त्यामुळे ह्याबाबत माझ्या पेक्षा नेहा भांडारकर किंवा नितीन वाघ ह्यांचाच सेकण्ड ओपिनियन महत्वाचा मला असे वाटते कि एकतर १०० टक्के विश्वास ठेवावा किंवा अजिबात नाही माझा तुमच्यावर १०० टक्के विश्वास ट्रस्ट आहे तुम्ही केलेले भाषांतर चेक करणे हा प्रकारही अविश्वास दाखवण्यासारखा होईल . मी लिहिलेल्या कवितांच्यात अडकून पडत नाही . हे चांगले कि वाईट मला माहित नाही

पुन्हा एकदा धन्यवाद

श्रीधर तिळवे नाईक



Monday, April 1, 2019

श्रीधर तिळवे नाईक

आत्म नहीं हैं सिर्फ कथा हैं
यही बड़ी शायद
आजकी व्यथा हैं

कई "मैं " मेरे ब्रेनमे आये
और सच ये हैं कि
हर मैं झूठा हैं

जोड़ तो रहा हूँ नेटवर्किंगसे
और नेटवर्क कह रहा हैं
तू मेरा सिर्फ एक हिस्सा हैं

एक क्लिकपे मिलती हैं आज मुमताज
मगर मोहब्बतसे पहलेही पूछती हैं
मेरा ताजमहल कहाँ हैं

ख्वाब और लॅपटॉपमे फ़र्क़ क्या ?
जो स्क्रिनपे आता हैं वो
यही सवाल पूछ रहा हैं
*****

दर्द अच्छा होता हैं
मरा नहीं हूँ एहसास होता हैं

वो तो सिर्फ विडिओमे जुल्फे उड़ाती हैं
मेरी आँखोंमे क्यूँ लहरोंका पदन्यास होता हैं

हर किसीके पास  रोगका इलाज हैं
फिर हर आदमी क्यों यहाँ बीमार होता हैं

मन तो मंटोपे आया हैं उसका
और मंटोंका रोज क़त्ल होता हैं

वो सीढ़िया चढ़के कल आगे निकल गया
और आज  उसने कहा की जो पीछे रहता हैं वो अपाइज होता हैं
***

कैमेरा झूठ बुलवाता हैं
आत्माका मर्डर करवाता हैं

मेकप चढ़ता हैं ब्रेनपे
ब्रेन अभिनेता बन जाता हैं

दुनिया बनती हैं कपडोंका बाजार
कॉस्च्यूम डिज़ाइनर सत्ता फैलाता हैं

सब सिन सीना तानते हैं
ऑडियंस कुर्सीमे बैठ जाता हैं

इतना सन्नाटा क्यों हैं भाई
फिल्म खत्म होनेके बाद कोई अँधा पूछता हैं














Friday, March 1, 2019

सर तुम्ही जो रस दाखवलाय त्याबद्दल धन्यवाद लिंक्स दिलेल्या आहेत "मोदींचे अर्थशास्त्र , जगाचे अर्थशास्त्र आणि भारतीय मध्यमवर्ग भाग पहिला    श्रीधर तिळवे नाईक " अशा टायटलखाली श्रीधर



विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो
मी अकादमीत येत होतो तेच मंगेश बनसोड ह्या माझ्या मित्रासाठी ! अचानक झालेल्या उलथापालथीत मंगेश बनसोड ह्यांना  पायउतार होण्यास भाग पाडले गेले माझा अकादमीशी संबंध हाच मुळी मंगेश मुळे होता त्यामुळे आता अकादमीत येण्याचे काही प्रयोजन राहिले नाही माझ्यावतीने तुम्हा सर्वांना मनापासून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा ! बाकी यदाकदाचित माझ्या मार्गदर्शनाची गरज भासली तर मी फोनवर उपलब्ध आहेच माझे नम्बर ९८९२२२९७३० व ९९३००६२४२७

आपला
श्रीधर तिळवे नाईक