Tuesday, March 8, 2022

जोशी कि कांबळे हा चित्रपट माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला कारण ह्याने माझे स्थलांतर घडवले मी अचानक मुंबई नावाच्या महाशहरातून बॉलिवूड नावाच्या नगरीत प्रवेश केला ही संस्कृती मुंबईचा भाग असली तरी मुंबईची क्रिमीलेयर संस्कृती होती ती उत्तर भारतीय संस्कृतीची  ट्रेन्डसेटर होती उत्तर  भारतीय भविष्यात कोणते कपडे घालणार उत्तर भारतीय भविष्यात कोणती गाणी गाणार उत्तर भारतीय भविष्यात कशी लग्ने करणार अशा अनेक गोष्टी बॉलिवूड ठरवतं तिथे जोशी कि कांबळे सारखा चित्रपट करून उतरणे ही एक रिस्क होती मी ती घेतली जोशी कि कांबळेनं अमेय वाघ हा अभिनेता लाँच केला 

ह्याच्या आधीच माझे राकेश सारंग आणि मनीष गोस्वामी असे काही दोस्त झाले होते पण हे एक भुलभुलैय्याचे जग होते २०१४ पर्यंत मी ह्या भुलभुलैय्यात वावरलो ह्या कालखंडातल्या ज्या कविता झाल्या त्या अवकाश आणि काळ बदलल्याने पूर्ण वेगळ्या झाल्या आणि शेवटी त्यांचा समावेश एका नव्या सिरीजमध्ये करणे क्रमप्राप्त झाले ह्यातल्या काही कविता मी इथे दिल्या होत्या उरलेल्या इथे पुन्हा टाकायला सुरवात केलीये 

श्रीधर तिळवे नाईक 

Friday, July 24, 2020


समविचारी सहविचारी विषमविचारी आणि विरुद्धविचारी श्रीधर तिळवे नाईक

आपल्या विचाराची मांडणी करताना आपल्यासारखा विचार करणारा भूतकाळात कोण होऊन गेला वर्तमानात कोण आहे असा विचार अंतःकरणात येणें हे सहज





हा मराठीतला एक मास्टरपीस आहे कल्पनाशक्ती किती कल्पक असावी त्याचा अजोड नमुना


अमला शंकर गेल्या भारतीय नृत्याचे अर्वाचिनीकरण घडवण्यात सिंहाचा वाटा असलेल्या उदय शंकर ह्यांच्या त्या भार्या  भारतीय नृत्याला अर्वाचीन बनवण्यात त्यांचाही  मोलाचा वाटा होता कल्पना चित्रपट त्याचा पुरावा एकंदरच नृत्याकडे नृत्य म्हणून आपण स्वतंत्रपणे बही घायला अद्यापही शिकलेलो नाही त्या शिकवणाऱ्या ज्या काही महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यापैकी त्या एक माझी त्यांना आदरांजली
श्रीधर तिळवे नाईक



स्वाभाविक आहे आपल्यासारखंच विचार करणाऱ्या माणसाला आपण समविचारी म्हणतो आपल्यासारखा नाही आपल्या विचारांच्या सदृश्य विचार करणाऱ्या माणसाला अपन विषमविचारी म्हणतो काही विचारवंत मात्र आपल्या विचाराच्या पूर्ण विरोधी असा 

Saturday, July 11, 2020



मी विरोधी कॉमेंट्सचाही आदरच करतो अनेकदा त्या पुरेशी माहिती नसल्याने आणि पुरेशी माहिती घेण्याची इच्छा नसल्याने निर्माण होतात बरे त्यात कॉमेंटकर्त्याचा दोष नसतो कारण समोर जे आहे त्यावर भाष्य करणं ही त्याची निकड असते करोनाला कसं सामोरं जायचं ह्याचं उत्तर गंभीर चेहऱ्यानं आणि सुतक पाळत असा त्यांचा समज असतो कि काय न कळे  कोणी डान्स करत सामोरा गेला तर त्यांना प्रॉब्लेम असतो बिचाऱ्यांना असो बाय द वे मी करोनावर खंडकाव्य लिहिलंय त्याचा हा एक तुकडा आहे

म्हणजे काय ते ह्याच कवितेच्या आधारे स्पष्ट करा म्हणजे मला मार्गदर्शन मिळेल

लिहितांना असा विचार न्हवता पण खंडकाव्य होत गेले आणि मी कवी आणि कविता ह्यांच्या दरम्यान कधी येत नाही

धन्यवाद दोन्ही कविता इथे आणल्याबद्दल 

Wednesday, July 8, 2020

दिल बहलांनेको गालिब ये खयाल अच्छा हैं

मराठीत जागतिक मूल्ये नाहीत नवं जग नाही म्हणून आधुनिकतावादी मराठी साहित्याला कमअस्सल म्हणायचे तर मराठी साहित्यात देशी मूल्ये नाहीत देशीवादी मराठीला कमअस्सल म्हणायचे म्हणजे मराठी साहित्य कमअस्सल आहे ह्यावर सगळ्यांचेच एकमत ! वस्तुस्थिती काय आहे ?
श्रीधर तिळवे नाईक


रोमँटिक आधुनिक देशी जालीय नवतेनंतर तुमची पिढी स्वतंत्र मानली तर तिची कोणती मूल्ये आमच्या आणि आमच्या आधीच्या पिढींपेक्षा वेगळी आहेत ?

जे जागतिक आहेत असं तुम्हांला वाटतं ते का जागतिक आहेत ? त्यांच्या साहित्यातील मूल्यांच्यामुळं कि मूल्यांचा जागतिक दर्जाशी काहीच संबंध नाही ?

जागतिक मूल्यं कोणती?
ती जागतिक आहेत हे कसं निश्चित झालं?
लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, सेक्युलॆरीझम, समता ही सामान्यत: जागतिक मूल्यं मानली जातात.
ही मूल्यं युरोपातील सांस्क्रुतिक आणि आर्थिक-ओद्योगिक घडामोडीतून स्थिर झाली. या मूल्यांचा स्वीकार केल्याने समाजाच्या संपत्तीत कित्येक पटींनी वाढ झाली.
या मूल्यांच्या स्वीकाराने युरोप गरीब झाला असता तर ही मूल्यं जागतिक बनली नसती.
देशी मूल्यं कोणती?
विषमता, निसर्गशरणता, माणूस आणि निसर्ग यांच्यातील सेंद्रीय संबंध, मानवता, करुणा, विविधता.
विषमता वगळता अन्य देशी मूल्यांची सांगड आधुनिक मूल्यांसोबत कशी घालायची हा प्रश्न भारतीय साहित्यात वारंवार चर्चिला जातो. प्रेमचंद, फणीश्वरनाथ रेणु, राही मासूम रझा, यू. आर. अनंतमूर्ती, शिवराम कारंत, तकाजी शिवशंकर पिलई, बशीर, म. फुले, श्री. म. माटे, व्यंकटेश माडगूळकर, गौरी देशपांडे, दया पवार, लक्ष्मण माने, नेमाडे, पठारे, श्याम मनोहर, यादी खूप मोठी आहे.
इंग्रजी साहित्य, फ्रेंच साहित्य, अमेरीकन साहित्य, जर्मन साहित्य,स्पॆनिश साहित्य, चिनी, जपानी, इराणी साहित्य, दक्षिण अमेरीकेतील स्पॆनिश साहित्य, तुर्की साहित्य असं अनेक भाषांमध्ये साहित्य प्रसिद्ध होतं.
या साहित्यात जागतिक मूल्यं आहेत की देशी?
समकालीन राजकारणात -रशिया, अमेरिका, युरोप, चीन, आधुनिक मूल्यांची पीछेहाट झालेली दिसते



जागतिक मूल्य कोणती ह्या प्रश्नाचं उत्तर 
"लोकशाही, व्यक्तीस्वातंत्र्य, सेक्युलॆरीझम, समता ही सामान्यत: जागतिक मूल्यं मानली जातात." असं तुम्हीच दिलंय 
ही सर्व मूल्ये प्रबोधनात्मक आहेत आधुनिकतेनं व उत्तराधुनिकतेनं ह्या मूल्यांच्यापुढे प्रश्नचिन्हे उभी केली हिटलरमुळे सेक्युलरिझमपुढं प्रश्नचिन्हे लागली कारण ज्यू धर्मियांना अतोनात छळले गेले लेनिन व माओने लोकशाहीपुढे प्रश्नचिन्हे उभी केली माणसे समान असतात ह्या मूल्यापुढे जनेटिक्सने प्रश्नचिन्हे उभी केली  तुम्ही म्हणता विषमता, निसर्गशरणता, माणूस आणि निसर्ग यांच्यातील सेंद्रीय संबंध, मानवता, करुणा, विविधता.ही देशी मूल्ये आहेत माझ्या मते ही धार्मिक मूल्ये आहेत आणि ती सर्वच देशात होती आणि त्यांच्यातील विरोधाभासही ! त्यात मी परंपरा ऍड करेन देशीवादाने ह्या धार्मिक मूल्यांना परंपरेच्या आधारे पुन्हा प्रस्तुत केलं आणि त्यांची सांगड प्रबोधनात्मक मूल्यांशी घालण्याचा प्रयत्न केला विशेषतः साहित्यात हे खूप झाले 


हे उत्तर मी सुनील तांबे ह्यांना दिलंय 


मध्यंतरात , globalization नंतर ' ग्लोबल व्हिलेज ' च्या जोडीनेच ' local is global ' हे वाक्य जोरात पसरलं होतं . तर त्यात कितपत तथ्य असेल ? की उलटी शक्यताच जास्त असेल ?
म्हणजे असं की आपलं पर्यावरण / संस्कृती / परंपरा हीच अंतिम न समजता त्याच्या पलीकडे एक माणूस म्हणून जे मांडू इच्छिते तेच जागतिक वगैरे ठरायची शक्यता जास्त नसेल ना ? थोडक्यात आपल्या पारंपरिक समजुती , चालीरीती , रूढी ह्या देशी जंजाळात / मानसिकतेत अडकून न बसता त्याची मापात दखल घेऊन जागतिक/ सार्वकालिक मानवी भावनांना केंद्रभागी ठेवून स्वतंत्र मांडणी करू इच्छिते ते जागतिक असू शकते


माॅलमध्ये मंगोल ही कथा लिहिल्यानंतर मला असं जाणवलं की माॅल हे जगभरातील समकालीन घटित आहे , तर त्यावर जगभरात काय काय फिक्शन लिहिलं गेलं आहे, त्याचा वेध घ्यावा तर जागतिक साहित्याचं वाचन करणार्या ज्या कुणाला मी विचारलं त्यापैकी कुणीच तसं काही वाचलेलं नव्हतं. नंतर मराठीतच आशुतोष पोतदार की हिमांशू स्मार्त अशा कोल्हापूरच्या एका तरूण नाटककाराचं एक नाटक आणि आता मेट्रोमाॅल 96 ही प्रणवची नवीन कादंबरी , ह्या अनुषंगाने जागतिक साहित्यातील माॅल ह्यावर कुणी एखादा लेख लिहिल्यास जागतिकतेचा वेध घ्यायला ते कामाचं ठरेल.




लिहिल्यास जागतिकतेचा वेध घ्यायला ते कामाचं ठरेल.





त आणि ती सर्वच देशात होती आणि त्यांच्यातील विरोधाभासही ! त्यात मी परंपरा ऍड करेन देशीवादाने ह्या धार्मिक मूल्यांना परंपरेच्या आधारे पुन्हा प्रस्तुत केलं आणि त्यांची सांगड प्रबोधनात्मक मूल्यांशी घालण्याचा प्रयत्न केला विशेषतः साहित्यात हे खूप झाले 


सॉरी टू से प्रथम ग्लोबलायझेशन ही संकल्पना आली जी महामार्गी होती नंतर ग्लोकलायझेशन जी मार्गी आणि देशी ह्यांचा संकर होती जिची लोकल इज ग्लोबल ही घोषणा होती तुमचे पुढचे म्हणणे बरोबर आहे 

आता मॉलविषयी तर आपल्यासाठी तो जेवढा मोठा सांस्कृतिक धक्का होता तेव्हढा तो यूरोअमेरिकेला न्हवता त्यामुळे आपले प्रतिसाद तीव्र होते आणि त्याचे पडसाद माझ्या आणि हेमंत दिवटेच्या कवितेत तुमच्या कथेत उमटले आशुतोषजिचे नाटक मी ना वाचलंय ना पाहिलंय त्यामुळे त्याविषयी मी काही बोलू शकत नाही प्रणवची कादंबरी ही उत्तम आहे ह्यावर लेख हवा हे मान्य आहे मॉल आणि लोकल बाबत एक मुद्दा मी सांगतो माझ्या कवितेत सुरवातीला जो मॉल आहे तो कोल्हापूरचा शेतकरी बाजार आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतातला हा पहिला मॉल आहे ह्या मॉलने आमचे तिळवे भांडार पूर्णपणे बंद पाडले आणि त्याचाही अनुभव कवितेत आहे नंतर मुम्बैचाही मॉल आहे जिथे मी कस्टमर आहे शेतकरी बाजार असल्यानेच इथे नांगरटीला नांगरही मिळतील ह्या अंगाने एक तुकडा आहे मुंबईचा मॉल असता तर हा आला असता काय ? तर नाही म्हणजे वैयक्तिक तिळवे भांडार बंद होणे देशी काही तुकडे व माझे मॉलला मालोबा म्हणणे म्हणजे खंडोबा  ज्योतिबा तसे हा मालोबा वैग्रे आणि पुन्हा मॉल हा जागतिक फिनॉमिनो असल्याने जागतिक महामार्गी ! आता हे सगळं ठरवून लिहिता येत नाही ते होत जात आणि आपण जागा करत देत जातो मी मॉलवर नंतरही कविता लिहिल्या (चॅनेल डिस्ट्रॉयरीत एक कवी ह्या टायटलखाली आहे )( मी माझ्याविषयी हे जे लिहिलंय ते नितीन वाघ ह्यांनी लक्ष्यात आणून दिलंय )जो जन्मजात मुंबईकर आहे असा लेखक मॉल असा बघेल का ? तर नाही . 
मॉल ही एक थीम झाली अशा आणखी कोणत्या थीम्स आपण हाताळल्या ज्या पूर्वीच्या लेखकांनी हॅन्डल केल्या न्हवत्या ?  म्हणजे व्हिडिओ गेमची एक थीम प्रणवने मस्त हाताळलीये किंवा सायबरकॅफ़े ही माझ्यासकट अनेकांनी हाताळलीये अमेरिकेच्या ट्वीन टॉवरवर  झालेला हल्ला हीही माझ्यासकट अनेकांनी हाताळलीये माझी एक कथाही होती ह्यावर ! (अमेरिकेचे अध्यक्ष आले तेव्हा ह्या कथासंग्रहात ती आहे ) इतर अनेकांच्या असतील मला वाटतं आपल्या पिढीचं नीट उत्खनन कुणीतरी केलं पाहिजे 







दिल बहलांनेको गालिब ये खयाल अच्छा हैं

मराठीत जागतिक मूल्ये नाहीत नवं जग नाही म्हणून आधुनिकतावादी मराठी साहित्याला कमअस्सल म्हणायचे तर मराठी साहित्यात देशी मूल्ये नाहीत देशीवादी मराठीला कमअस्सल म्हणायचे म्हणजे मराठी साहित्य कमअस्सल आहे ह्यावर सगळ्यांचेच एकमत ! वस्तुस्थिती काय आहे ?
श्रीधर तिळवे नाईक

मराठीत देशीवाद अनेक पद्धतीने आला म्हणजे नेमाडेंनी तो भाषात्मक तर दिलीप चित्रेंनी तो सर्जनात्मक अंगाने आणला  द ग गोडसे ह्यांनी तो दृश्यात्मक पद्धतीने आणला किंबहुना त्यांच्या देशीवादाला दृश्यात्मक देशीवाद म्हणावा इतका तो दृश्यात्मक आहे  त्यांच्या पुस्तकांची टायटल्स म्हणजे पोत ,शक्तिसौष्ठव, ऊर्जायन, वाकविचार, मातावळ वैग्रे पाहिली तरी हे स्पष्ट व्हावे ते दृश्यात्मकतेमागील तिच्या सौष्ठवामागील अवकाश ,ऊर्जा , चुंबकत्व , मस्तत्व (त्यांना मस्तानी आवडायचं कारण तिचे मस्तत्व होतं ) शाक्तत्व  ह्यांचा धांडोळा घेत राहिले आपल्याकडे साठोत्तरी पिढीचा सांगोपांग धांडोळा घेतला जाईल तेव्हा कदाचित गोडसेंनी आपणाला काय दिलं हे जास्त कळेल 

Wednesday, June 24, 2020

श्रीमंत बांधती
शिवाचे मंदिर
मी तर गरीब
कसे बांधू

पाय माझे खांब
धड  हेच  तीर्थ
शीर हे शिखर
सुवर्णाचे

ए कुंडलेश्वरा
स्थिर पडणार
चल  चालणार
कायमचे

संत बसवण्णा

भाषांतर : श्रीधर तिळवे नाईक 

Sunday, June 14, 2020





Pramodkumar Anerao श्रीधर सर
आत्महत्या या विषयावर आपले सविस्तर मत मांडले तर बरे होईल.
कारण आत्महत्या या प्रकाराला सरळ गांडुगिरी या प्रकारात टाकून आपण मोकळे होतो.पण या विषयाचे इतके सुलभीकरण किंवा सपाटीकरण मला पटत नाही

असं लिहिलं आणि प्रश्न पडला काय लिहायचं ? दिलीप धोंडो कुलकर्णी ह्या माझ्या कविमित्राने आत्महत्या केली तेव्हा त्याच्यावर कविता आली होती ती कव्ही ह्या संग्रहात टाकली होती मी आत्महत्येवर अनेक कविता लिहिल्या माझ्या आयुष्यात आत्महत्या आली ती माझ्या विश्रांती मावशीच्या संशयास्पद आत्महत्येपासून ! संशयास्पद ह्यासाठी कि ती हत्या होती कि आत्महत्या हे आजही स्पष्ट नाही माझ्या आईचं आपल्या बहिणीसाठी धाय मोकलून रडणं काळीज पिळवटतं आजही तिचं नाव निघालं कि घरात सन्नाटा पसरतो आणि आईचं दुःख घरभर वावरायला लागतं

पुढे रंकाळ्यात अनेक आत्महत्या पाहिल्या कवितेत प्रकट झाल्या काही वर्षांपूर्वी माझा लहानपणापासूनचा मित्र डॉक्टर अभय पाटील गेला आणि सन्नाटा गडद झाला त्याच्यावर कविता आली तिच्यात मला जे म्हणायचं आहे ते सर्व आहे जीवच द्यायचा असेल तर मोक्षासाठी किंवा निर्वाणासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे ? मोक्ष म्हणजे आतल्या आत मरणं तर असतं भक्तीच्या भाषेत ईश्वरात जाऊन मरणं निदान योग्य जागी आत्महत्या पणाला लावण्याचं समाधान
आणि खात्रीने नंतर आनंद जो आत्महत्या गायब करतो आणि आधिक मोठ्या जीवनाला उपलब्ध करतो कविता देतोय तिच्यात मला जे म्हणायचं आहे ते सर्व आहे ती देतोय

अभय पाटील गेला तेव्हा श्रीधर तिळवे नाईक 


तू डॉक्टर होतास 
आणि तू आत्महत्या करणार नाहीस 
ह्याची सर्वांना पक्की खात्री होती 

आणि तू खात्री मोडीत काढलीयेस 


मेडिकल नेसून आर्किटेक्चरल माईंड सेटप 

आपण लहानपणापासून एकत्र चाललोय 
जेव्हा रस्ते झाडांनी लगडलेले होते 

आपल्या शाळेपुढचे वृक्ष शाळेने कापले गेले न्हवते 

रस्त्यावर भीक मागणारी एक आजी मेली 
तेव्हा रक्तवान सर म्हणाले 
हे प्रेत पार्लमेंटमध्ये पाठवले पाहिजे 
आणि आपण हसत राहिलो 


तुझ्या आत्महत्येचे रिफ्लेक्शन माझ्या खोलीत 

आणि मला प्रश्न पडलाय 

माझ्यातला डॉक्टर अभय पाटील जाळायचा कसा ?



आपण चाललोय 

आपल्यासोबत चालणारी दोन कुत्री 
आपल्याला तोंडपाठ आहेत 

समोरून लाळ गाळत चाललेले तामझाम 
आपल्याला तोंडपाठ होतायत 

तुला मारायची दिली गेलेली धमकी 
आणि त्या धमकीला आडवा गेलेलो मी 

आपली मैत्री त्या फायटिंग स्पिरिटमध्ये 
धूमकेतूसारखी उगवली
आणि कैक आकाशगंगा जगली  

तू स्कॉलर 
आणि मी वाट चुकलेला ऑर्डीनरी 

" राजू डोकं आहे पण अभ्यास करायला नको 
नुसतं उंडरायला पाहिजे 
तुझी मैत्री रॉंग लोकांच्या बरोबर आहे "

तुझ्या बुद्धिमत्तेचा शोध तुला उशिराच लागला 
आणि मग तू थांबलाच नाहीस 


 

दफ्तरे फक्त दफ्तरे नसतात 
त्यांच्यात  बापाचा घाम असतो 

पाठ्यपुस्तकात सिलॅबस असतो 
जो नंतर अख्ख आयुष्य कंट्रोल करणार असतो 

शिक्षक आदर्शांचे ताजमहाल बांधत असतात 
आणि आपणाला माहीत नसतं 
कि आपण त्यांच्यात जाऊन मरणार आहोत 

मला सिलॅबस पाठ होत नाहीये 
मी कशात जाऊन मरणार आहे ?


मला एक अमृतानं भरलेली विहीर हवी 
आणि शेती काही एकर 

मला समुद्राचा गोड किनारा हवा 
जिथे मी मीठ चवीचवीने विकेन 

तुझं बरं आहे 
तिळवे भांडार आहे 
व्यवसाय करत सरकत राहशील 

तू बोलतोयस 

तुझ्या देखणेपणात अनेक महत्वाकांक्षा आहेत 
हे मला आजच कळतंय 

आयला
 प्रायव्हेटची सगळीच पोरं हुशार 
आपलीच जुळत नाही तार 


मला फक्त जगायचं 
एव्हढंच येतं 

तू काय सचिन ताम्हाणे काय किंवा भानुशाली काय किंवा एकसंबेकर काय 
आमच्यासारख्यानी तुम्हांला फक्त दुरून पहायचं 

मला आकांक्षाच नाही 
का नाही 
माहीत नाही 

मला फक्त जगायचंय 


कधीतरी हे घडणारच होतं 

तू बोर्डात आलायस 
आणि ईश्वराचा संधिवात बरा करणारी बोटं तुला अव्हेलेबल होतायत 

तुझ्या कुरळ्या केसात नद्या वाहतायत 
आणि आमच्या बोटी निघण्याआधीच बुडलेल्या 

मित्रांच्यातले सामाजिक अंतर 
अंतःकरणांना टाईट करून जातं 

मी नुसतं जगण्याकडून 
नुसतं असण्याकडे सरकलोय 
आणि तुझे हॉस्पिटल आभाळाचा मुका घेण्यास सज्ज 


मित्रांच्यात संन्यास घेऊन हिंडणं सोपं नसतं 
त्यांनी कुठलातरी प्रायव्हेट हायस्कुलमधला 
किंवा न्यू कॉलेजमधला श्रीधर तिळवे जतन केलेला असतो 
आणि संन्यास म्हणजे भगवे कपडे 
एव्हढंच इक्वेशन डोक्यात फिट्ट ठेऊन 
ते वावरत असतात 

प्रकाश मेहतांनं काढलेल्या बॅचग्रुपवर 
आपण एकमेकांना क्लिक होतोय 

माझा एका चुकीकडून दुसऱ्या चुकीकडे जाणारा प्रवास 
चालूच आहे 

मेडिटेशनमधले प्रयोग 
मरणावरचे प्रयोग असतात 

अंतर आणि आस्था ह्यांना मेंटेन करत 
मी सर्वांना भेटतोय 

साधकाला मित्रही आरशासारखे असतात 
वासना दाखवणारे 

माझ्या अंतरराखणीला अहंकार म्हंटल जाणं स्वाभाविक 

त्यांना तो श्रीधर तिळवे हवा आहे 
जो मेलेला आहे 

तू मला एकांतात भेट अशी जवळ जवळ ऑर्डर देऊन 
निघून गेलायंस 

हक्काचा मैत्रीटोन टिकलेला 

१०

" फक्त उदासी आहे श्री 
आणि पोकळपणा 

सांगतापण येत नाही 
आणि दाखवता पण येत नाही 

तू ह्यांच्यात घुसलायस 
तर घनता दाखव 

मला माझ्यावर शस्त्रक्रिया करायची आहे 

शारीरिक नाही आत्मिक 

आत्मा असतो ? "

११ 

मी बालपणी ठरवल्याप्रमाणे तू बांधलेली विहीर बघतोय 
तिच्यात अमृत नाही 

मी तुझे कैक एकराचे शेत बघतोय 
आणि तू विचारतोयस 
" ह्या जमिनीला आपली आवश्यकता आहे काय "

अमृत आत आहे अभ्या 
आणि आपण जमिनीचे अवयव आहोत 

१२

आपण बोलतोय बोलतोय बोलतोय 
जणू गॅप न्हवतीच 

पेशन्ट्स येतायत जातायत 

तू खरं कशावरून बोलतोयस श्रीधर 

तेही जाणायला तुला खरं शोधायला हवं 
आणि त्यासाठी डॉक्टर असण्याचा अहंकार सोडायला हवा अभ्या 

बोर्डात येणं हे मोक्षप्राप्तीचं क्वालिफिकेशन नाहीये 

१३

" बायको आणि पोरांसाठी चोख बंदोबस्त करून ठेवलाय 
तू आता कोल्हापुरात आलास कि फक्त माझ्याकडं उतरायचं 
भेटत राहू  "

भेटत राहू 

हो भेटत राहू 

आपल्या मिठीत 
तेच जुनं प्रायव्हेट हायस्कूल आहे 
जे आपण खूप वर्षांपूर्वी 
सोडून दिलं होतं 

१४

तू कधी येणारयास ?

तुझे फोनवर फोन 

मला बोलायचंय 
आणि हे मी फक्त तुझ्याशी बोलू शकतो 

तलाव भरला कि पुराचे प्रश्न समोर ठाकतात अभ्या 
आणि उपाय समुद्रात विरघळून जाणे आहे 

तू माझ्यापेक्षा डबल स्ट्रॉंग आहेस अभ्या 
प्रश्न सहज सोडवशील 
हे मोक्षाच्या असोशीचे प्रश्न आहेत 
आणि हे यशानंतर उभे ठाकतात 

तू तुकारामासारख्या कविता का लिहीत नाहीस श्री ?
कारण मी तुकाराम नाही 
आपण फक्त आपलं आयुष्य लिहू शकतो कवितेत 

तुझा आकांत मला कळतोय मित्रा 
पण मी मुंबईत आणि गोव्यात अडकून सीताराम आहे 

कोल्हापूरला ये श्री कोल्हापूरला ये 
मला तुझी गरज आहे 

१५

मित्रांना गरज असते 
आणि आपण तिथे नसतो 

नुसत्या व्हर्चुअल मिठ्या 
मिथ्या असतात 

प्रकाश मेहता सांगतोय 
अभ्या गेला 
आत्महत्या 

एक सन्नाटा आहे 
जो कुठल्याही पिनने आता फुटणार नाही 

तुझ्या आत्महत्येच्या टोकावर 
मी शेवटचा उपाय होतो का 
माहीत नाही 

संपन्नतेतील आत्महत्या 
सर्व सुखं असतांना आत्महत्या 

नेमकं काय मिसिंग असतं ?

मोक्ष कि आणखी काही ?

विहिरीत फक्त पाणी आहे 
आकाशात फक्त आकाशगंगा आहेत 

तू ह्या दरम्यान आत्महत्या बनून तरंगतोयस 

मरायचंच असेल तर ईश्वरात जाऊन मरायचं 
हे असं माणसात मरणं 
बोर्डात आलेल्याला शोभतं का अभ्या ?

आता मी काय तुझा चेंदामेंदा डेकोरेट करू ?

श्रीधर तिळवे नाईक 

(निर्वाण सिरीजमधील  . व्ही .   ह्या काव्यफाईलीतुन  )