Tuesday, March 8, 2022

जोशी कि कांबळे हा चित्रपट माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉईंट ठरला कारण ह्याने माझे स्थलांतर घडवले मी अचानक मुंबई नावाच्या महाशहरातून बॉलिवूड नावाच्या नगरीत प्रवेश केला ही संस्कृती मुंबईचा भाग असली तरी मुंबईची क्रिमीलेयर संस्कृती होती ती उत्तर भारतीय संस्कृतीची  ट्रेन्डसेटर होती उत्तर  भारतीय भविष्यात कोणते कपडे घालणार उत्तर भारतीय भविष्यात कोणती गाणी गाणार उत्तर भारतीय भविष्यात कशी लग्ने करणार अशा अनेक गोष्टी बॉलिवूड ठरवतं तिथे जोशी कि कांबळे सारखा चित्रपट करून उतरणे ही एक रिस्क होती मी ती घेतली जोशी कि कांबळेनं अमेय वाघ हा अभिनेता लाँच केला 

ह्याच्या आधीच माझे राकेश सारंग आणि मनीष गोस्वामी असे काही दोस्त झाले होते पण हे एक भुलभुलैय्याचे जग होते २०१४ पर्यंत मी ह्या भुलभुलैय्यात वावरलो ह्या कालखंडातल्या ज्या कविता झाल्या त्या अवकाश आणि काळ बदलल्याने पूर्ण वेगळ्या झाल्या आणि शेवटी त्यांचा समावेश एका नव्या सिरीजमध्ये करणे क्रमप्राप्त झाले ह्यातल्या काही कविता मी इथे दिल्या होत्या उरलेल्या इथे पुन्हा टाकायला सुरवात केलीये 

श्रीधर तिळवे नाईक