Wednesday, July 17, 2019

  w

मुलाखतीनंतरही एक मुलाखत चालू राहते तसे हे लिखाण आहे स्वतःला समजून घेण्याचा आपल्या आसपास जे घडतंय ते समजून घेण्याचा प्रयत्न आहे इतरांच्यापर्यंत तो  पोहचत नसेल तर त्याची नेमकी कारणं काय ? पोस्टमॉडर्न भाषा ही आजही स्कॅन केली जातआहेच असो अहंकार स्पष्टता अंधुक करतो असे काही होते आहे का तेही पाहायला हवे

अभ्यासक्रम माहित नसतांना क्लासेस कसे घेणार ?

असा नका विचार करू काही गोष्टी जुळून यायला उशीर होतो देरसे आना ठीक हैं गर तंदुरुस्त आते हो 
जागतिक दर्जाची गुणवत्ता आपणाला स्वतःहून का कळत नाही ? आपले ह्याबाबतीतले नेमके घोळ काय आहेत ? कि आपली गुणवत्ता ओळखण्याची क्षमता वर्णजातीगोतावळा व्यवस्थेने मारून टाकली आहे ? आपण ज्यांना मान्यता दिली ती आपण दिली कि जगाने मान्यता दिल्यावर आपण दिली ? जागतिक गुणवत्ता ओळखण्याच्या आपल्या कसोट्या काय आहेत नोबल बुकर प्रायझेस ?त्यांचा खप ? त्यांना मिळालेली प्राईस ? मानधन ?

 ज्याला नोबल मिळालेले नाही असे समकालीन परदेशी लेखक आपण वाचतो ?आपण अत्यंत भुक्कड लेखक कवी मराठीबाहेर का प्रमोट करतो ? चांगला लेखक मान्यतेअभावी मरून जावा अशीच आपली व्यवस्था आहे काय ?

समानता वसाहतवाद १७५७ ते १८५७

,वसाहतवाद १८५७ ते १९४७ ,

 नववसाहतवाद १९४७ ते १९७८

आणि उत्तरवसाहतवाद १९६५ ते १९९०

अशा चार स्टेप्स आपणाला स्पष्ट दिसतात हे सर्व सोडून आपण एकदम देशीवादाची चर्चा का करायला लागलो ?
आफ्रिकेतल्या अत्यंत मागासलेल्या देशातसुद्धा ह्या चर्चा झडझडून झाल्या पण भारतात नुसती पत्रकारिता झाली ?
का ?

श्रीधर तिळवे नाईक





ह्याचा अर्थ आपण समकालीन साहित्याला न्याय देणारे समीक्षक निर्माण करण्यात अयशस्वी झालोय असा होत नाही का ? काव्याग्रहसारखे नियतकालिक चौथ्या नवतेकडे सरकू सुद्धा शकत नाही ह्याचे कारण काय ? देशीवादात गटांगळ्या किंवा सत्यकथेचे कीर्तन हे मराठी साहित्याचे स्वभावविशेष झाले आहेत काय ? प्रचारासाठी फेसबुक वैग्रे चौथी नवता आणि साहित्य मात्र तिसऱ्या किंवा दुसऱ्या नवतेचें ह्या विरोधाभासाचे काय करायचे ? देशीवादाने ऐंशोत्तरी आणि नव्वोदत्तरी गिळली का आणि आताची समकालीन म्हणवून घेणारी पिढीही देशीवादाच्या बसमध्ये का चढू इच्छिते ?






मान्यतेला फाट्यावर मारत लिहायला लागणे हे त्या संस्कृतीचे अपयश असते जोतिबा फुलेंच्यापासून अनेक लेखक हे फाट्यावर मारूनच लेखन करत आले आहेत माझा प्रश्न लेखकाला हे का करावे लागते हा आहे ?
गोतावळा व्यवस्था हे सर्व करत असेल तर आपण सर्व गोतावळे का फाट्यावर मारत नाही ? सर्वचजण गोतावळ्याच्या भाषेत का समीक्षा करायला लागतात बर सत्यकथेने स्वतःच्या मूल्यव्यवस्था तरी डिफाइन केल्या होत्या देशीवादाने नवी मूल्यव्यवस्था डिफाइन करण्याचा प्रयत्न केला ऎशोत्तरी पिढीने निदान साठोत्तरी पिढीपेक्षा आमचा देशीवाद कुठे वेगळा आहे हे तरी नीट डिफाइन करायला नको काय ?


























१ मे २००९



रात्र जी डावी होती डावरी होती अभिताभ बच्चनसारखी
उजवी झालीये शाहरुखखानसारखी

श्रम सूक्ष्म आणि नग्न होत चाललाय
जेणेकरून चाबूक मारताना कपडे फाटणार नाहीत

पराभव टाळ्या वाजवतोय
एन्ड ऑफ हिस्ट्रीच्या

शेवट मृत्यूचं चुंबन घेणार कि पुनर्जन्माचं
कुणालाच माहित नाही

बसवेश्वर म्हणाले सर्व श्रमांना समान प्रतिष्ठा
आणि सर्व श्रमांना समान वेतन

माझ्यासाठी कम्युनिझम बस्वेश्वरांच्यापासून सुरु होतो

छातीला छाती भिडवून
हात पकडत श्रमांना मिठीत घेण्याचं युग संपलं का ?



शंकराच्या चंद्रकोरीपाशी मी कधीच विळा ठेवला नाही
गांधींचा झाडू ठेवला
आणि नांगर

अनुभवमंडपात बसतांना बसवेश्वरांना हत्या होण्याआधी जी निराशा आली होती
तीच आता सर्व श्रमिकांच्या  काळजात

पृथ्वीचं चुंबन घेऊ पाहणारे
स्वतःच्या ओठांना टिकवण्याची धडपड करतायत

मार्क्सचा जन्म काही राजांना मुकुट देण्यासाठी झाला होता
आणि त्यांना मुकुट मिळाले
त्यांनी राज्य केले
आणि सर्व राज्यांप्रमाणे हीही राज्ये धुळीला मिळाली

आता ती धूळ भारताच्या प्रत्येक गल्लीतून
हरलेल्या राणीसारखी हिंडतीये
म्हणून शोक कशाला ?



मे डे डिमॉन्स्ट्रेशन्सच्या विळाफेकीवर
एक सभ्य मर्डर
तरंगणारा

गडचिरोलीचा धूर हॅंड्सप करून निघून गेलाय

तुम्हांला ह्या देशाची मूळंच पकडता आली नाहीत
आणि तुम्ही झाडावर शेखचिल्लीसारखे बसून

सेमसेक्स मॅरेज सारखं एक फिलिंग
ज्याला गव्हाच्या दाण्याची परिपूर्ती नाही

चे गव्हेराचे टी शर्ट घालून मी कधी फिरलो नाही
मात्र बसवेश्वरांचे कायक मी आयुष्यभर सांभाळले

आळसाला वाट मिळू नये
आणि श्रमांना काट मिळू नये
हा समतोल साधावा कसा

माझ्या घरात माझी सारी भावंडं कामगार
ह्याची मला कधीच लाज वाटली नाही

त्यांच्या श्रमांना योग्य मोबदला नाहीये
आणि प्रतिष्ठाही

सकाळ सूर्याचा कप घेऊन येते
प्रकाशाचा चहा पाजते
संध्याकाळी सूर्य समुद्रात विसळून निघून जाते
ह्यामागे केवढी अवाढव्य उलाढाल आहे
हे मी जाणतो

श्रमांची प्रतिष्ठा सकाळच्या कपापासून सुरु होते



कम्म्युनिझम मेला तरी श्रम अमरच असणार आहेत
त्यामुळं श्रमाला टाळू म्हणणारे युटोपियात जगतायत

मी युटोपियन नाही

पण
इकॉनॉमिक क्रायसिस आला कि कम्युनिझमला संधी
इकॉनॉमिक डिप्रेशन आले कि भांडवलशाहीचा अंत
इतका भोळसट्पणाही
बसवेश्वरांनी आम्हाला शिकवलेला नाही

डोळे ताणवून सरोवरात समुद्र पाहणे
ही विद्या नाही
भ्रम आहे

१९८९ न्यू वर्ल्ड ऑर्डर
आणि २००८ बँकिंग सिस्टीम कोलॅप्स म्हणजे
वर्ल्ड ऑर्डर कोलॅप्स
इतकं सर्व सोपं ?

गेले कित्येक महिने
नवा दरवाजा उघडलाय
आणि आत कोणीतरी वाट पाहतंय

कार्पोरेटशाही म्हणजे काय रामसेचा  हॉरर पिक्चर वाटला काय तुम्हाला
कि सापडली भुतं
आणि पिटाळली भूतं ?



जेव्हा श्रमांचा  चेहरा दिसत नाही
तेव्हा श्रमांचे पाय दिसतात हात दिसतात

आणि ज्यांना हातपाय दिसत नाहीत
त्यांना डोळे नसतात

वजनी आधारांना
आजारसुद्धा कबूल करू न देणारी व्यवस्था

डोळे कायम फुटबॉलसारखे हलते

रक्ताचा लाल पाठलाग आणि मागोवा

वाली नसल्यासारखी तगमग तगमग

श्रमांना इतका पोरकेपणा कुठल्या युगात होता ?



१ मे अजून श्रमांची पुण्यतिथी म्हणून साजरी करत नाही हीच मेहरबानी

नेमकं काय चुकलंय ?

टोकाला जाणारे धड मध्यातही परतलेले नाहीत

एक दारू तयार झाली आणि सम्पली इतकंच ?

आधी हम दो हमारा एक
मग पूर्ण निर्व्यसनी असणे
मग
मग

मी बोलायला खूप बोलू शकतो
माझ्या जीभेने राजीनामा दिलाय

तुम्ही दारूची बॉटल फोडा
आणि कंडोम वापरा

लेबर इज अ टेल कंट्रोल्ड बाय अँन इडियट

श्रीधर तिळवे नाईक

(नेट सीरिजमधील नेट थिम्स मधून )









H


B










L